Advertisement

राष्ट्रवादीचं मनसेला प्रत्युत्तर, हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

मनसेच्या हनुमान चालिसा पठनाला आता राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे.

राष्ट्रवादीचं मनसेला प्रत्युत्तर, हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!
SHARES

मनसेच्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनाला आता राष्ट्रवादीनं (NCP) प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं (Iftar party) आयोजन करण्यात आलं आहे. साखळीपीर हनुमान मंदिरात ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

हनुमान जयंतीच्या प्रसादानं मुस्लीम नागरिक आपला रोजा सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान शनिवारी राज ठाकरे हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. तर शनिवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात राज ठाकरे महाआरती करणार आहेत. मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती.

मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावणार, या राज ठाकरेंच्या भूमिकेचा राष्ट्रवादीनं विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीनं आंदोलनही केलं होतं. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे वातावरण शांत राहावे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.हेही वाचा

राज ठाकरेंच्या 'त्या' भुमिकेनंतर ३५ मुस्लिम कार्यकर्त्यांचा राजिनामा

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २ वर्षे रखडणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा