आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रतिमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये पेन्शन अाता मिळणार अाहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अनुक्रमे पाच हजार अाणि अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल.

उपसमितीच्या बैठकीतील निर्णय

आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक बुधवारी महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झाली. यावेळी पेन्शनचा निर्णय घेण्यात अाला. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

पेन्शनसाठी निकष

या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.


हेही वाचा -

फुलेंच्या पगडीचा विरोध शिवसेनेनं जाहीर करावा – नवाब मलिक

राहुल गांधींनी 2.47 मिनिटांत उरकली पत्रकार परिषद


 

पुढील बातमी
इतर बातम्या