Advertisement

राहुल गांधींनी 2.47 मिनिटांत उरकली पत्रकार परिषद

दररोज पेट्रोलचे दर आकाशाला भिडत आहे, हा पैसा कुठं जातो? गरिबांचे पैसे घेऊन सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणावी परंतु पंतप्रधानांना इंटरेस्ट नाही असं म्हणत राहुल गांधीनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

राहुल गांधींनी 2.47 मिनिटांत उरकली पत्रकार परिषद
SHARES

संपूर्ण देशात महाआघाडी असावी, अशी जनतेची भावना असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं. जेमतेम अवघ्या दीड मिनिटांच्या पत्रकार परिषदेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष केलं.


पत्रकार परिषदेला उशिरा हजर  

बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र ती सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाली आणि 9.23 पूर्वीच म्हणजे पावणे तीन मिनिटांत संपली.


पेट्रोल महाग का?

पंतप्रधान, भाजप आणि आरएसएस यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना निर्माण झाली आहे. दररोज पेट्रोलचे दर आकाशाला भिडत आहे, हा पैसा कुठं जातो? गरिबांचे पैसे घेऊन सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणावी परंतु पंतप्रधानांना इंटरेस्ट नाही असं म्हणत राहुल गांधीनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.


गब्बरसिंह टॅक्स

नोटबंदी केली, गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे संपूर्ण देशातील जनता नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहे.त्यासाठीच आमची लढाई सुरू असल्याचंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा -

राहुल गांधी म्हणाले, मी तुमचा रक्षणकर्ता!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा