Advertisement

राहुल गांधी म्हणाले, मी तुमचा रक्षणकर्ता!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी गोरेगाव येथील पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावताना भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, मी तुमचा रक्षणकर्ता!
SHARES

सर्वांना माझा नमस्कार, सगळेजण कसे आहात? अशी मराठीतून भाषणाला सुरूवात करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठी माणसांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न तर केलाच, पण सोबतच वकृत्व आणि भाषाज्ञानाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्याचाही प्रयत्न केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी गोरेगाव येथील पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावताना भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.


काय म्हणाले राहुल?

प्रत्येकाच्या मनात आज एक भिती आहे, ही भिती घालवण्याचं काम काँग्रेस आणि मी तुमचा रक्षक बनून करणार आहे, तुम्हा सगळ्यांना जोडून ठेवण्याचंही काम मी करणार आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांसह राज्यातील जनतेला बळ आणि विश्वास देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला.


पुढच्या निवडणुकीत भाजपा गायब

डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्या, त्यात कसंबसं भाजपा वाचलं. तर कर्नाटकातल्या निवडणुकामध्ये भाजपा हरलं. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका असून या निवडणुकामध्ये भाजपा दिसणार नाही. तर २०१९ लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपाला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.मुंबईकरांचं केलं कौतुक

मुंबई हे शहर सर्वांना जोडण्याचं काम करतं. मुंबईमध्ये प्रत्येक माणूस आपला धर्म-जात विसरून जातो, त्याला मुंबईही स्वीकारते. इथं कामाची किंमत होते, असं म्हणताच राहुल गांधी यांनी मुंबई ही करून दाखवणाऱ्यांची मुंबई आहे आणि म्हणूनच ती देशाची आर्थिक राजधानी असल्याचं म्हणत मुंबईसह मुंबईकरांचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे, तर काँग्रेसची तुलना मुंबईशी करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.


'आम्ही माणसं जोडतो'

काँग्रेस ही मुंबईसारखीच आहे, काँग्रेस सर्वांना स्वीकारते, काँग्रेस माणसं जोडते, असंही ते यावेळी म्हणाले. असं असताना दुसरीकडं भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आम्हाला विचारतात की काँग्रेसनं काय दिलं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की, आम्ही माणसं तोडण्याचं काम करत नाही आम्ही माणसं जोडतो असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली.

भाजपा सरकार सर्वत्र दबाव तंत्राचा वापर करत आहे, काँग्रेसच्या काळात मात्र असा कोणतंही आणि कुणावरही दबाव तंत्र नव्हतं, असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले. तर उद्योगपतींची कर्जमाफी, शेतकर्यांची कर्जमाफी, बेरोजगारी असा विषयांवरही भाजपाला आणि मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न यावेळी राहुल गांधी यांनी केला.हेही वाचा-

आधी सगळ्या आॅफर येऊ दे मग ठरवू- उद्धव ठाकरे

प्रणव मुखर्जी तर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार- संजय राऊतसंबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा