Advertisement

प्रणव मुखर्जी तर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार- संजय राऊत

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत प्राप्त न झाल्यास मुखर्जी यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदारही होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

प्रणव मुखर्जी तर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार- संजय राऊत
SHARES

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळातील तर्कवितर्कांना चांगलाच उत आला अाहे. त्यातूनच प्रणव मुखर्जी भाजपात सामील झाल्यास, त्यांना भाजपाकडून काय संधी मिळू शकते. यावरही गरमागरम चर्चा सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत प्राप्त न झाल्यास मुखर्जी यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदारही होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. 


बहुमत न मिळाल्यास प्रणवदा

काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी भाजपप्रणित एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, असा अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवण्यात अपयश येऊ शकतं. 

तेव्हा भाजपाच्या हातात सक्षम उमेदवार असावा यासाठी आरएसएस तयारी करत आहे. त्याचदृष्टीने बहुमत मिळण्याची शक्यता धूसर असल्यास संघाकडून प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढं केलं जाऊ शकतं.  यावेळी भाजपच्या कमीत कमी ११० जागा कमी होणार हे निश्चित असल्याचं राऊत म्हणाले.


 

संजय राऊत यांनी वर्तवलेल्या अंदाजावर प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट केलं. 'मिस्टर राऊत, भारताच्या राष्ट्रपतीपदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर माझे वडील पुन्हा सक्रिय राजकारणात येणार नाहीत'.


 


संघ कार्यक्रमात  उपस्थिती

नागपुरातील संघ मुख्यालयात ७ जूनला आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणव मुखर्जीं यांनी उपस्थिती लावली होती . तसंच त्यांनी संघाच्या मंचावरुन राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडत देशभक्तीचे धडे दिले होते.हेही वाचा -

शिशीर शिंदेंचा 19 जूनला शिवसेनेत अधिकृत प्रवेश

मंगळवारी राहुल गांधी शरद पवारांना भेटणार ?


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा