मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येत अाहेत. भिवंडी कोर्टात सकाळी हजर राहिल्यानंतर ते गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या दौऱ्यादरम्यान राहुल अाणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार असल्याचीही चर्चा अाहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अाणि राष्ट्रवादीमध्ये अागामी विधानसभा निवडणूकीबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते.
राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीसहीत इतर अनेक पक्षांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूकीत अाघाडी करण्याबाबत विचार करत अाहे. २०१९ मधील निवडणूकांमध्ये विरोधक एकत्र येण्याची शक्यता अाहे. यामुळंच राज्यात महाअाघाडी करण्याबाबत शरद पवार यांनी राहुल गांधी यांना प्रस्ताव दिला अाहे. राष्ट्रवादी अाणि काँग्रेससह सहयोगी पक्षांमध्ये बहुजन समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, आरपीआय, गवई, कवाडे गट अाणि बहुजन विकास आघाडी यांना सामील करण्याचा प्रस्ताव अाहे.
हेही वाचा -
काँग्रेसला हवाय समविचारी पक्षांचा हात!
शिशीर शिंदेंचा 19 जूनला शिवसेनेत अधिकृत प्रवेश