Advertisement

शिशीर शिंदेंचा 19 जूनला शिवसेनेत अधिकृत प्रवेश


शिशीर शिंदेंचा 19 जूनला शिवसेनेत अधिकृत प्रवेश
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार आहेत. 19 जूनला शिवसेनचा वर्धापन दिन आहे. याच दिवशी त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश होईल. त्यामुळे मनसेला मात्र चांगलाच धक्का बसणार आहे.


लवकरच शिवसेनेत प्रवेश

काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. त्यामुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.

यापूर्वी राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. यांच्याबरोबरच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंबई उपनगरात मनसेला चांगलाच फटका बसणार आहे.


कोण आहेत शिशीर शिंदे?

मनसेचे विद्यमान सरचिटणीस असलेले शिशीर शिंदे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे मनसेच्या 13 आमदारांपैकी एक होते. ते भांडुपमधून विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यानंतर ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान निर्णयप्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवल्याने ते नाराज होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा