Advertisement

संघाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधीवर आरोप निश्चित


संघाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधीवर आरोप निश्चित
SHARES

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अखेर भिवंडी न्यायालयानं मंगळवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरणी आरोप निश्चित केले. राहुल गांधी यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचं स्पष्ट केलं.

२०१४ मधील लोकसभा निवडणूक प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधीची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केल्याचा आरोप केला होता. याविरोधात भिवंडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजेश कुंटे नावाच्या कार्यकर्त्यांनं मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असून राहुल गांधींना यापूर्वीही न्यायालयात हजर रहावं लागलं होतं. मंगळवारी १२ जून रोजी राहुल यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार सकाळीच राहुल गांधी मुंबईत दाखल झाले अाणि विमानतळावरून ते भिवंडीला गेले.


पुढील सुनावणी १० आॅगस्टला

न्यायालयानं आरोप निश्चित केल्यानंतर न्यायालयाबाहेर आलेल्या राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महागाई आणि इंधनवाढीचा मुद्दा उचलत आमची लढाई ही मोदींच्या धोरणाविरोधात असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. माझी लढाईही विचारधारेची लढाई आहे. त्यात आम्ही जिंकूच असं सांगतानाच राहुल गांधी यांनी आपल्याविरोधात असे कितीही खटले भरले तरी त्याला सामोरे जाऊ असंही म्हटलं. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १० आॅगस्ट रोजी होणार असल्यानं आता काँग्रेससह सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडं लागलं आहे.


गोरेगावमध्ये सभा

भिवंडीवरून राहुल गांधी गोरेगावसाठी निघाले असून गोरेगावमध्ये त्यांची सभा होणार आहे. तर त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. भाजपमुक्त आणि मोदीमुक्त भारताची घोषणा विरोधकांनी दिली असून ही घोषणा २०१९ मध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली सर्वच समविचारी पक्षांकडून सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीकडं पाहिलं जात आहे. त्यामुळे या भेटीकडंही सर्वांच लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

आधी सगळ्या आॅफर येऊ दे मग ठरवू- उद्धव ठाकरे

 मंगळवारी राहुल गांधी शरद पवारांना भेटणार ?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा