Advertisement

LIVE - राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर


LIVE - राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
SHARES

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते भिवंडी न्यायालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहतील. ही सुनावणी भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.ए. शेख यांच्या कोर्टात होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

यावेळी हा दावा समरी ट्रायलप्रमाणे चालवता जाणार नसून तो समन्स ट्रायलप्रमाणे चालवावा, या आशयाच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार आहे.

12.18 - ही लढाई निश्चित जिंकू - राहुल गांधी

12.17 - विचारधारेसाठी लढाई सुरू राहणार - राहुल गांधी

12.15 - शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर मोदी मौन - राहुल गांधी

12.14 - याचिकेवरील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला

11.41 - राहुल गांधींना न्यायालयाचे आरोप अमान्य 

11.40 - न्यायालयाकडून राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित

11.39 - राहुल गांधी भिवंडी न्यायालयात उपस्थित, न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा

11.31 - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल 

11.10 - सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात

काय आहे आरोप?

महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली.


विमानतळावर या कार्यकर्त्यांची उपस्थिती

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं मंगळवारी मुंबई विमानतळावर आगमन होताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत यांनी स्वागत केलं.

राहुल गांधी मुंबईत दाखल झाल्याच्या निमित्ताने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये बूथ स्तरीय काँग्रेस कार्यकर्ता महासंमेलन आयोजित केलं आहे. या महासंमेलनाला राहुल गांधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.


असा असेल मुंबई दौरा

  • भिवंडी न्यायालयाच्या सुनावणीनंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती
  • दुपारी सव्वा तीन वाजता राहुल गांधींची गोरेगावमध्ये सभा
  • काँग्रेस ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रोजेक्ट शक्ती कॅम्पेन करणार सुरू, अनावरण राहुल गांधींच्या हस्ते
  • प्रत्येक बूथ कार्यकर्ता आपलं व्होटर आयडी राहुल गांधींना पाठवणार
  • कार्यकर्त्यांना तीन प्रकारचं साहित्य देणार
  • मोदी सरकार चार वर्षात कसं अपयशी ठरलं यावर आधारित 'विश्वासघात' हे पुस्तक कार्यकर्त्यांना दिलं जाईल
  • रस्ते, नालेसफाई, शिक्षण, आरोग्य या विषयांचा समावश असलेलं चार पानांचं तिसरं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेवर असेल
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement