प्रिया दत्त, पूनम महाजनांविरोधात तृतीयपंथी रिंगणात

आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसंतशी निवडणुकीतली रंगतही वाढत चालली आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसनं माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे या दोघांनाही टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार तृतीयपंथी स्नेहा काळे यांनी अर्ज दाखल केला आहे.

अपक्ष उमेदवारी अर्ज

विद्यमान खासदार पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना टक्कर देण्यासाठी तृतीयपंथी स्नेहा काळे यांनी बुधवारी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काॅमर्स ग्रॅज्युएट असलेल्या काळे यांनी पहिल्यांदाच समुदायातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वातंत्र्यानंतर तृतीयपंथी समुदायाच्या विकासावर कधीच लक्ष देण्यात आलं नसल्याचं त्यांनी बोलतान स्पष्ट केलं.

विकासावर भर

निवडणूक जिंकल्यास आर्थिक मागास, सैनिक, विधवा स्त्रिया आणि आपल्या समुदायातील लोकांच्या विकासासाठी आपण करणार असल्याची माहिती स्नेहा काळे यांनी दिली. तसंच आपल्या लोकसभा क्षेत्रात आपल्या समुदायातील ३० ते ४० हजार लोक राहत असून ते आपल्याला शक्य तितकी मदत करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 


हेही वाचा -

रविवारी उर्मिला मातोंडकर, हार्दिक पटेल करणार संयुक्त प्रचार

भाजपाविरोधात राज ठाकरे राज्यभरात घेणार ८ ते ९ सभा


पुढील बातमी
इतर बातम्या