Advertisement

रविवारी उर्मिला मातोंडकर, हार्दिक पटेल करणार संयुक्त प्रचार

काँग्रेसची उत्तर मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल रविवारी संयुक्त प्रचार सभा घेणार आहेत. रविवारी अंधेरीत काँग्रेसच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

रविवारी उर्मिला मातोंडकर, हार्दिक पटेल करणार संयुक्त प्रचार
SHARES

काँग्रेसची उत्तर मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल रविवारी संयुक्त प्रचार सभा घेणार आहेत. रविवारी अंधेरीत काँग्रेसच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये हार्दिक पटेल आणि उर्मिला मातोंडकर सहभागी होणार आहेत.


 प्रचाराला सुरूवात

उत्तर मुंबईतून काँग्रेसनं उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर केली आहे. तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसनं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांना उमेदवारी दिली आहे. सध्या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे.


हार्दिक पटेल बाहेर

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानंही हार्दिक पटेलच्या निवडणूक लढवण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयानं त्याच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर त्यानं देशभरात काँग्रेसच्या प्रचारास सुरूवात केली होती.


न्याय योजनेवर भर

काँग्रेसनं यावेळी बेरोजगारीवर सरकारला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं गरीब बेरोजगारांना ७२ हजार रूपये देण्याच्या न्याय योजनेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच काँग्रेसच्या रॅलीत उर्मिला मातोंडकर आणि हार्दिक पटेल काय बोलतात याकडं आता सर्वांच लक्ष लागलं आहे.




हेही वाचा -

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं किरीट सोमय्यांचा पत्ता कट - संजय निरुपम

शिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा