Advertisement

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं किरीट सोमय्यांचा पत्ता कट - संजय निरुपम

भाजपनं मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे.

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं किरीट सोमय्यांचा पत्ता कट - संजय निरुपम
SHARES

भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध होता. किरीट सोमय्या यांनी अनेकदा शिवसेनेवर अनेकदा टीकाही केली होती. त्यामुळं त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नसून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यामुळं किरीट सोमय्या यांच्याऐवजी बुधवारी भाजपनं इशान्य मुंबईसाठी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. दरम्यान भाजपनं मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे. 


ट्विटवरून टीका

'किरीट सोमय्या यांनी मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढला. त्याचीच त्यांना शिक्षा मिळाली. भ्रष्टाचार संपवण्याचा भाजपानं जो संकल्प घेतला होता, त्याचं काय झालं ?, भ्रष्टाचाराचे जे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते, त्यांची सीबीआय चौकशी होणार काय?’, असा सवाल उपस्थित करत संजय निरुपम यांनी भाजपवर ट्विटवरून टीका केली आहे.



'वांद्र्याचा बॉस'

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडले होते. त्यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत माफियाराज असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 'वांद्र्याचा बॉस' असे शब्द वापरले होते. किरीट सोमय्यांच्या या टीकेमुळं त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध होत होता.



हेही वाचा -

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय

दिवा स्थानकात महिला प्रवाशांचा रेल्वे रोको



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा