Advertisement

दिवा स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर गुरुवारी सकाळी ६.५६ वाजताच्या सुमारास महिला प्रवाशांनी रेल रोको केला.

दिवा स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात गुरुवारी सकाळी महिला प्रवाशांनी रेल रोको केला. रेल्वे प्रवासावेळी महिला प्रवासी दरवाजा अडवून उभं राहत असल्यामुळं दिवा स्थानकातील महिलांना लोकलमध्ये चढता येत नाही. त्यामुळं याचा विरोध करण्यासाठी काही महिला प्रवाशांनी रुळांवर उतरून रेल रोको केलं. त्यामुळं ऐन गर्दीच्यावेळी सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्यामुळं लोकल मार्गस्थ झाली.


रेल रोको

दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर गुरुवारी सकाळी ६.५६ वाजताच्या सुमारास महिला प्रवाशांनी रेल रोको केला. दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेनं जाणारी जलद लोकल दिवा स्थानकात आली असता, महिला डब्यातील प्रवाशी दरवाजा अडवून उभे राहिले होते. त्यामुळं स्थानकातील महिलांना डब्यात चढता आलं नसल्यानं त्यांनी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना खाली खेचलं. तसंच, हा प्रकार मोटरमनला सांगितला. त्याचप्रमाणं काही महिला प्रवाशांनी याचा विरोध म्हणून थेट रुळांवर उतरल्या आणि लोकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी १० ते १५ मिनिटं प्रवाशांनी लोकल थांबवून ठेवली होती.

मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा स्थानकातून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा स्थानकात थांबतात. मात्र, काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून उभं राहतात. त्यामुळं दरवाजाताच गर्दी असल्यानं दिवा स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही.हेही वाचा -

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजयRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा