शपथविधीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 2 हजार पोलिस तैनात

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  गुरूवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे बहुतांश कार्यक्रम हे शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी शिवसेना आग्रह असते. त्यामुळेच  गुरूवारी होणाऱ्या या शपत विधीसोहळ्याला देशभरतून बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुच्चितप्रकार घडू नये. या दृष्टीकोनातून खबरदारी घेत. मुंबई पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या सोहळ्याचे भव्य स्वरूप पाहता मुंबई पोलिसांकडून कार्यक्रमासाठी तब्बल 2000 पोलीस सुरक्षेकरता  तैनात केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

हेही वाचा :-आदित्य ठाकरेंनी 'या' कारणास्तव घेतली सोनिया गांधींची भेट

 दसरा मेळावा आणि राजकिय सभा सोडल्या तर महत्वाचे शासकिय कार्यक्रम क्वचितच शिवाजी पार्कवर आजपर्यंत घेतले गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या या शपतविधी सोहळ्याला भाजप विरोधातील इतर राज्यातील अनेक दिग्गज नेेते उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीॆना ही शिवसेनेकडून आमंञित केले असल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेत, मुंबई पोलिस बुधवारी सकाळपासूनच शिवाजी पार्कात पोलिस सुरक्षा वाढवली.  या सोहळ्याच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्याने त्यात आणखी भर पडली. त्यानुसार मुंबई पोलिसांचा तब्बल 2000 जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कँमेऱ्यांव्दारे लक्ष ठेवले जाणार आहे.

यामध्ये स्थानिक बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग, अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश असणार आहेत. तर परिसरातील महत्वांच्या रस्त्यांना नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. तर कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता. वाहतूक कोंडी होऊ नये. या दृष्टीकोनातून  वाहतूकीच्या मार्गक्रमणात ही बदल करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या