शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दिल्लीत गेले होते. आदित्य यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि शपथविधीचं पहिलं निमंत्रण दिलं.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बुधवारी संध्याकाळी तातडीनं दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर आदित्य यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
दरम्यान, शिवतीर्थावर गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आणखी सहा जण शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे २ मंत्री उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील. तर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये ३ डिसेंबरला होणार आहे.
हेही वाचा