हायकोर्टाला चिंता शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेची

मुंबई उच्च न्यायालयाने शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.

SHARE

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत. 

हेही वाचा- अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

विकाॅम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत शिवाजी पार्क हे मैदान खेळाचं मैदान आहे की सार्वजनिक कार्यक्रमांचं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आय छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  

त्यावर भाष्य करताना खंडपीठाने म्हटलं की, उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. मात्र या सोहळ्यासाठी गुरूवारी शिवाजी पार्क मैदानावर लाखोंच्या संख्येने लोकं जमा होतील. त्यामुळे या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घ्या. शिवाजी पार्कवर नेहमी असे सोहळे होत नाहीत. परंतु सार्वजनिक मैदानावर अशा सोहळ्यांचे पायंडे पाडू नका. उद्या कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. हेही वाचा-

महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामासंबंधित विषय
ताज्या बातम्या