केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची कोरोनावर मात

केंद्रीय अधिवेशन सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. गडकरींनी आज कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी स्वतःट्वीटरच्या माध्यमातून सांगितले. काही दिवसांपूर्वी अशक्त पणा जाणवू लागल्यामुळे गडकरींनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.

कोरोनाची लागण झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतःचे विलगीकरण केले. तसेच आपल्या संपर्कात असलेल्या आणि आलेल्यांनाही काळजी घेण्यास सांगितली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी आज पुन्हा ट्विट करत कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे. "आपणांस मला हे सांगताना आनंद होत आहे की, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे” अशा आशयाचे ट्विट स्वत: नितीन गडकरी यांनी केले आहे  कोरोनामुळे गडकरी हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे , परवेश साहिब सिंह यांंच्यासह अन्य १७ खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दुसरीकडे कोरोनावर मात करुनही प्रकृती अस्वास्थ्यात असलेले अमित शहा सुद्धा नुकतेच बरे झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या