Advertisement

सत्तास्थापनेबाबत नितिन गडकरींनी दिला होता सूचक इशारा

राजकीय घटनाक्रमांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली होती

सत्तास्थापनेबाबत नितिन गडकरींनी दिला होता सूचक इशारा
SHARES

रातोरात सत्तास्थापनेची गणित बांधून शनिवारी राजकिय भूकंप घडवणाऱ्या भाजपचा सत्तास्थापनेचा हा प्लॅन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवला होता. मात्र गडकरींच्या बोलण्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही.  एका सांस्कृतिक कार्यक्रमात “आपण आधीच म्हटलं होतं की क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकत. काही दिवसांपूर्वी मी ‘राजकारण आणि क्रिकेट यात काहीही अशक्य नाही. ते खरं ठरलं, असे गडकरी म्हणाले.

या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता भाजपने अजित पवारांच्या मदतीने शनिवारी सत्तास्थापन केली. त्यामुळे सर्वसामान्यासह राजकीय पंडितांच्या भूवया उंचवल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत पाठिंबा दिला. त्यानंतर सकाळी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या राजकीय घटनाक्रमांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आहे.

 एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकत. हातातली मॅच जात आहे. असं वाटत असतानाच बाजी पलटते,  त्याच प्रमाण राजकारणात ही असतं. त्यामुळे ‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो.’ गडकरींनी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरलं, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल, हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे, माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा,” असं गडकरी म्हणाले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा