उपराष्ट्रपती वेंकैया नायडू कोरोना पॉझिटिव्ह

भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू (७१) रुटीन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची चाचणी निगेटीव्ह आहे. उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली.

उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नायडू यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसून आली नाहीत. सध्या नायडू यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना डॉक्टरांनी क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे. नायडू यांची पत्नी उशा नायडू यांचीही करोना चाचणी केली गेली होती. पण त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्या सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यासह काही मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अमित शहा आता कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा

राज्यात मध्यावधी निवडणूक? संजय राऊत म्हणाले…

राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ

पुढील बातमी
इतर बातम्या