Advertisement

राज्यात मध्यावधी निवडणूक? संजय राऊत म्हणाले…

महाराष्ट्रात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे.

राज्यात मध्यावधी निवडणूक? संजय राऊत म्हणाले…
SHARES

महाराष्ट्रात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील, तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, असं राऊत म्हणाले आहेत. (shiv sena mp sanjay raut reacts on chandrakant patil statement on midterm elections in maharashtra)

जेव्हा दोन वेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच, असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची सामनातील मुलाखत घेण्यासाठी भेट घेतली होती. ही मुलाखत अनएडिटेड असेल. याआधी मी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहे.  

हेही वाचा - राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ

ज्याप्रमाणे जेव्हा दोन शास्त्रज्ञ भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे यावर चर्चा करतात. त्यानुसार जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते स्वाभाविकच राजकीय क्षेत्रावर बोलतात. राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का? जर दोन राजकीय नेते भेटत असतील दर देशाबद्दल, कृषी विधेयक, जम्मू-काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोरोनाबद्दलच त्यांच्यात चर्चा होते, असा चिमटादेखील संजय राऊत यांनी काढला.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचा दावा चंद्रकात पाटील करत असले, तरी असले भूकंप आता तरी होणार नाहीत. त्यासाठी त्यांनी गजर वैगेरे लावला असेल तर मला माहिती नाही. पुढची ५ वर्षे काही काम नसल्याने आमच्या भेटीने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील, असंही संजय राऊत म्हणाले.

राज्यात मध्यावधी निवडणुकांचा भूकंप कधीही होऊ शकताे. कोरोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. मध्यावधी निवडणुका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील; पण शेवटी कोणाचीच समीकरणं जुळली नाहीत, तर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या राजकीय समीकरणाची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा