आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. नेते आपापल्या पक्ष संघटनांचा आढावा घेत असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
असे असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले होते की, “मलाही राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे.”
मात्र, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आता जोरदार पलटवार केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. “राज ठाकरेंना सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही महापालिका निवडणूक लढवणार नाही,” भाई जगताप म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या अटकळांना वेग आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत जगताप यांनी दिले. आयएएनएसशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“Let alone Raj Thackeray, we will not contest the upcoming municipal elections even with Uddhav Thackeray,” said Bhai Jagtap.
भाई जगताप काय म्हणाले?
"काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जवळपास सर्वांनी हेच मत व्यक्त केले. आमचे नेते रमेश चेन्नीथी यांनाही सांगण्यात आले की या स्थानिक निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांसाठी आहेत, केवळ नेत्यांसाठी नाही. कार्यकर्त्यांनाही लढण्याची संधी आहे. त्यामुळे आपण शिवसेनेशी युती करू नये आणि राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
“We will not contest the Mumbai Municipal Corporation elections with Uddhav Thackeray, let alone Raj Thackeray. Even when I was the president of the Mumbai Congress, I had made this clear ‘on Danke Ki Chot’,” said Bhai Jagtap.
“In the recent Congress meeting, almost everyone expressed the same view. Our leader Ramesh Chennithy was also told that these are local elections, meant for our workers, not just for leaders. The workers too deserve an opportunity to contest. Therefore, we should not ally with the Shiv Sena, and there is no question of joining hands with Raj Thackeray.”
भाई जगताप पुढे म्हणाले की, "आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसने राज ठाकरेंना स्वीकारणार असे कधीच म्हटले नाही आणि कधीच करणार नाही. महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरेंची एकहाती आघाडी नसून युती आहे. ती स्थापन झाली तेव्हा शिवसेना एकच होती, आता दोन आहेत. उद्धव ठाकरे स्वतःचे निर्णय घेऊ शकतात, काँग्रेसही स्वत:चे निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीची रणनीती ठरवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
हेही वाचा