सेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का ?- निलेश राणे

भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राज्यात सध्या सर्वत्र टिका होत असताना. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे पून्हा शिवसेनेला चिमटा काढला आहे. पुस्तकावरून शिवसेना राजकारण करत असल्याचा आरोप करत निलेश राणेंनी भाजपला कायम अंगावर घेणाऱ्या संजय राऊत यांना ट्विटवरून ‘सेनाभवनवर महाराजांच्यावर बाळासाहेबांचे स्थान का ?’ असा प्रश्न करत कोंडीत पकडल आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून कालपासून भाजपला लक्ष्य करत आहेत. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाचे छायाचित्र ट्विट केले आहे. सेना भवनात आमच्या महाराजांपेक्षा स्व. बाळासाहेबांना वरचे स्थान का दिले? संजय राऊत यावर कधी बोलणार?, असा सवाल निलेश राणे उपस्थित केला आहे. या छायाचित्रात शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या अडचणीच्या प्रश्नाला आता शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याशिवाय पातळी ओलांडून  निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्याविषयी लिहिले आहे. मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राणे परिवारामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः-बेस्ट कर्मचाऱ्यांचा २७ जानेवारीला मोर्चा

पुढील बातमी
इतर बातम्या