म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचं स्वप्न साकार करू पाहणारे मुंबईकर गेल्या कित्येक महिन्यांपासून म्हाडाच्या लाॅटरीची वाट पाहत होते. परंतु म्हाडाकडून त्यांना केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून १० नोव्हेंबरला म्हाडाच्या ८१९ घरांसाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात लाॅटरी फुटणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने गुरूवारी लाॅटरीची अधिकृत घोषणा करत मुंबईकरांना ही खुशखबरी दिली आहे.
घरे | उत्पन्न गट | ठिकाण |
---|---|---|
८ | अत्यल्प गट | प्रतिक्षानगर, सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली |
१९२ | अल्प गट | कन्नमवार नगर, चारकोप, कांदिवली, सिद्धार्थनगर, चांदिवली, मानखुर्द, मालवणी, मालाड |
२८१ | मध्यम गट | प्रतिक्षानगर, सिद्धार्थ नगर, उन्नत नगर, चारकोप, गायकवाडनगर-मालवणी |
३३८ | उच्च गट | तुंगा पवई, चारकोप, शिंपोली |
अर्ज शुल्क ३३६ रुपये
इथे करा अर्ज : म्हाडा संकेतस्थळ - https://mhada.maharashtra.gov.in, mhada.gov.in
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)