चौफेर खरेदीने दुसऱ्या दिवशीही तेजी

रेपो  दरात वाढ करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी पहायला मिळाली. बँक, वाहन, रियल्टी अादींसहीत सर्व शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने ४९९ अंकांची उसळी घेतली होती. तर निफ्टीही १० हजार ८०० च्या वर जाण्यात यशस्वी झाला. 

अखेरीस नफावसुली 

दिवसभर असलेली तेजी अखेरच्या सत्रात काहीअंशी थांबली. शेवटच्या अर्धा तासात वरच्या पातळीवर नफा वसुली दिसून अाली. त्यामुळं अखेरीस सेन्सेक्स २८४ अंकाने वधारून ३५ हजार ४६३ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीही ८४ अंकांनी वधारत १० हजार ७६८ वर स्थिरावला. गुरूवारी बीएसइमधील १९५० पेक्षा अधिक शेअर्समध्ये वाढ झाली.

 

मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये जोरदार खरेदी

लार्जकॅपसहीत मिडकॅप अाणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दुसऱ्या दिवशीही खरेदी दिसून अाली. मिडकॅपमध्ये  सेल, आयडीबीअाय एबीबी, अदानी पाॅवर, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स  कॅपिटल, कॅस्ट्रॉल इंडिया, वक्रांगी, बीईएल, कॅनरा बँक, जिंदाल स्टील,  बर्जर पेंट्स, एफएफएसएल, एमआरपीएल, रिलायन्स इंफ्रा, सन टीवी अाणि  जीएमआर इंफ्राचे शेअर्स ३.३७ ते ६.६६ टक्के वाढले. 


हेही वाचा - 

कर्जे महागणार, अारबीयकडून रेपो दरात वाढ

व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीज दिवाळखोरीकडे


पुढील बातमी
इतर बातम्या