Advertisement

व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीज दिवाळखोरीकडे


व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीज दिवाळखोरीकडे
SHARES

कर्ज चुकवण्यात अपयश अाल्याने  व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीज दिवाळखोरीच्या मार्गावर अाहे. राष्र्टीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या मुंबई पिठाने व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीजच्या विरोधात कर्जदारांची दिवाळखोरीची याचिका स्विकारली अाहे. त्यामुळे दिवाळखोरी कायद्यानुसार व्हिडीओकाॅन राष्र्टीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या अंतर्गत अाली अाहे. 


तब्बल २१ हजार कोटी रुपयांचे कर्जाची परतफेड करण्यास कंपनीला अपयश अालं अाहे. पुढील १८० दिवसात लिलावामार्फत कंपनीच्या नवीन मालकाचा शोध घेतला जाऊ शकतो.  व्हिडीओकाॅन  दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याने गुरूवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. बीएसइमध्ये कंपनीचा शेअर ५ टक्क्याने घसरून ८.६२ रुपयांवर अाला. ५२ अाठवड्यातील हा निचांक अाहे. कंपनीवर ४४ हजार कोटींचे कर्ज

रिझर्व्ह बँकेकडून दिवाळखोरी कायद्यानुसार व्हिडिओकाॅनचा समावेश केल्याने कंपनीला कर्ज देणाऱ्यांनी कंपनीविरोधात राष्र्टीय कंपनी कायदा न्यायाधिकरणक़डे धाव घेतली. व्हिडीओकाॅन इंडस्ट्रीजवर एकूण ४४ हजार कोटी रुपयांचं कर्ज अाहे. कंपनीचे निम्मे कर्ज हे त्यांच्या परदेशातील कंपन्यांचंअाहे. मात्र, परदेशातील कंपन्यांकडून कर्जाची परतफेड होत असल्याने कर्जदारांनी त्यांच्याविरोधात पाऊल उचललेलं नाही.


कर्जाच्या परतफेडीसाठी विकली संपत्ती

कर्जाची परतफेड करण्यासाठी व्हिडीओकाॅनने मागील दोन वर्षात अापल्या केनस्टार ब्रँडची विक्री  एवरस्टोन कॅपिटलला केली. तसेच कर्जाच्या परतफेडीसाठी अापली जमीन विकणार असल्याचंही कंपनीनं बँकांना सांगितलं अाहे. मुंबईत फोर्टमध्ये कंपनीचं मुख्यालय अाहे. हे मुख्यालय मागील वर्षी कंपनीने ३०० कोटी रुपयांना विकलं. हे अाता टाटा समूहाचं मुख्यालय अाहे. 
हेही वाचा - 

कंपन्यांना 'अच्छे दिन', बँकांनी केलं १ लाख कोटींचं कर्ज माफ

कर्जे महागणार, अारबीयकडून रेपो दरात वाढ 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा