Advertisement

कंपन्यांना 'अच्छे दिन', बँकांनी केलं १ लाख कोटींचं कर्ज माफ

अारबीअायच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ ते २०१७ या कालावधीत बँकांनी देशातील कंपन्यांचं २ लाख ४२ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं अाहे. एकीकडे थकीत कर्जामुळे बँकांचं कंबरडं मोडलेलं असताना कंपन्यांवर बँका एवढ्या उदार का झाल्या अाहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला अाहे.

कंपन्यांना 'अच्छे दिन', बँकांनी केलं १ लाख कोटींचं कर्ज माफ
SHARES

कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वसामान्यांकडे तगादा लावणाऱ्या बँका कंपन्यांबाबत मात्र उदार झाल्याचं दिसून येत अाहे. अार्थिक वर्ष २०१७-१८ या वर्षात १० सरकारी बँकांनी खासगी कंपन्यांचं तब्बल १ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं अाहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर अाली अाहे.

कंपन्यांवर बँका उदार

अारबीअायच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ ते २०१७ या कालावधीत बँकांनी देशातील कंपन्यांचं २ लाख ४२ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं अाहे. एकीकडे थकीत कर्जामुळे बँकांचं कंबरडं मोडलेलं असताना कंपन्यांवर बँका एवढ्या उदार का झाल्या अाहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला अाहे.

एसबीअायकडून सर्वाधिक कर्ज माफ

२०१६-१७ या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाने २० हजार ५७० कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. तर २०१७-१८ या वर्षात एसबीअायने माफ केलेल्या कर्जाचा अाकडा ४० हजार १९६ कोटी रुपये अाहे. एका वर्षात एसबीअायच्या कर्जमाफीत तब्बल ५० टक्के वाढ झाली अाहे.

कोणाचं किती कर्ज ?

भूषण स्टीलनं ५६ हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ ३३ टक्के कर्जाची परतफेड केली आहे. त्याशिवाय अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीकडून ६० टक्के तर बिनानी सिमेंट कंपनीकडून कर्जाच्या ९० टक्के रक्कम बँकेला परत मिळणं अपेक्षित आहे. एस्सार स्टिलकडून ४९ हजार कोटींपैकी ३९ हजार कोटी वसूल झालं असून अजून ११ हजार कोटी रूपये येणं बाकी आहे.

याशिवाय लँक्रो इन्फ्राटेकने बुडवलेल्या कर्जामुळे तब्बल ४५ हजार कोटींचा फटका बँकांना बसला अाहे. अलोक इंडस्ट्रिजनंही ३० हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ ५ हजार कोटींची परतफेड केली आहे.

अागामी काळात या कंपन्याकडून कर्जाची रक्कम परतफेड करण्यात आली नाही, तर बँकांना जवळपास १ लाख २० हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. 

हेही वाचा-

'आरबीआय'चं ग्राहकांना आवाहन, 'तीन दिवसात करा तक्रार'संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा