Advertisement

'आरबीआय'चं ग्राहकांना आवाहन, 'तीन दिवसात करा तक्रार'


'आरबीआय'चं ग्राहकांना आवाहन, 'तीन दिवसात करा तक्रार'
SHARES

डिजिटल इंडिया या अभियानानंतर देशात डिजिटल पद्धतीने पैशांचा व्यवहार वाढत चालला आहे. मात्र असे ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. अशा प्रकरारच्या फसवणुकीनंतर त्याची तक्रार आणि त्यावर प्रक्रिया होईपर्यंत बराच अवधी निघून जातो. मात्र आरबीआयने आता यावर तीन दिवसात तक्रार करता येणार असल्याचं सांगितलं आहे.


कशी कराल तक्रार?

तीन कार्यालयीन दिवसात आपली तक्रार संबंधित बँकेच्या शाखेत करा, त्यानंतर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी बँकेची असेल, असं आवाहन आरबीआयने ग्राहकांना केलं आहे.


असं झाल्यास...

४ जून २०१८ पासून आरबीआयने देशात वित्तीय साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे. ८ जून पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात वित्तीय साक्षरतेबरोबरच बॅंक शाखांमध्ये बॅनर आणि पोस्टर यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक व्यवहार, डिजिटल बॅंकेचा वापर आणि ग्राहकांची आर्थिक सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण एक महिन्याच्या आत न झाल्यास, तसेच पूर्व सूचना न देता खात्यावर कुठलेही शुल्क आकारणी केल्यास बँकिंग लोकपालाच्या समक्ष तक्रारसुद्धा करता येणार असल्याचं आरबीआयने सांगितलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा