अखेर 'त्या' मुलीने दिला बाळाला जन्म

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी देऊनही अखेर 31 आठवड्यांची गर्भवती असलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन बलात्कार पीडितेनं एका मुलाला जन्म दिला आहे. या मुलीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी मुलीची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिसरात रहाणाऱ्या फैय्याज अहमद इरशादने वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. मुलीचे वजन वाढू लागल्यानंतर तिला थायरॉईड तर नाही ना अशी शंका येऊन पालकांनी तिला डॉ. निखिल दातार यांच्याकडे नेले. मात्र मुलीला दिवस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली.

दरम्यान, डॉ. निखिल दातार यांनी मुलीच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत गर्भपाताची परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. न्यायालयीन लढ्यानंतर अखेर 31 आठवड्यांची गर्भवती असलेल्या पीडित मुलीला सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली.

12 आठवड्यांमध्येच मुलाचे अवयव तयार होतात. सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली होती. मात्र, यातून मुलीच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे सिझेरियन डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. आई आणि बाळ सुखरुप आहेत. बाळाचे वजन 1.8 किलो आहे.

डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोग तज्ज्ञ, जे. जे. हॉस्पिटल

मात्र गर्भपाताऐवजी डॉक्टरांनी पुढे उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन मुलीची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा

‘तिच्या’सोबत नेमकं काय घडलं असावं?

पुढील बातमी
इतर बातम्या