Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

31 आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला सर्वोच्च न्यायालयाची गर्भपाताची परवानगी


31 आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला सर्वोच्च न्यायालयाची गर्भपाताची परवानगी
SHARES

31 आठवड्यांची गर्भवती असलेल्या 13 वर्षाच्या बलात्कार पीडितेला सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. वैद्यकीय अहवालानुसार पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका असल्याने न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.

आपल्या मुलीला थायरॉईडचा त्रास झाला असेल असे गृहीत धरून पीडितेच्या पालकांनी महिन्याभरापूर्वी तिला मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडे नेले होते. मात्र तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

20 आठवड्यांपुढील गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. मागील काही महिन्यांंत सुप्रीम कोर्टाने काही महिलांना गर्भपाताची परवानगी दिली होती. आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आता, सरकारने गर्भपात कायद्यात बदल करून गर्भपाताची मुदत ही 24 आठवड्यांपर्यंत वाढवावी.

- डॉ. निखिल दातार

आपल्या मुलीसोबत नेमके काय झाले? याची जराही कल्पना तिच्या पालकांना नव्हती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने तिच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मुलीचा गर्भपात करायचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला. पण, भारतात 20 आठवड्यांवरील गर्भपातास कायद्याने परवानगी नाही. म्हणून डॉ. निखिल दातार यांनी मुलीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास मदत केली. त्यानंतर बुधवारी हा निर्णय सुनावण्यात आला.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. ज्यात गर्भपाताची शस्त्रक्रिया ही जोखमीची असल्याची माहिती देण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या मुलीला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर 8 सप्टेंबरला गर्भपाताची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

अॅड. निशांत कातनेश्वरकर, वकील, सुप्रीम कोर्ट

या मुलीवर बलात्कार करणारा आरोपी फैय्याज अहमद इरशाद याला पोलिसांनी महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशमधून अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. फैय्याज हा नागपाडा परिसरात टेलरिंगचे काम करत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या या पीडित मुलीशी त्याची ओळख झाली. त्यातूनच आरोपीने तिच्या अज्ञानाचा फायदा उचलत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तो उत्तर प्रदेशला पळून गेला होता.

दरम्यान, डॉक्टर निखिल दातार यांनी गर्भपाताची परवानगी दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - 

‘तिच्या’सोबत नेमकं काय घडलं असावं?

200 टक्क्यांनी वाढले 'सिझेरियन'


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा