Advertisement

‘तिच्या’सोबत नेमकं काय घडलं असावं?


‘तिच्या’सोबत नेमकं काय घडलं असावं?
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडे आलेल्या एका रुग्णामुळे ते अवाक झाले. त्यांच्याकडे एक अशी गरोदर महिला आली होती जिच्यावर कसे आणि काय उपचार करावे हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. अर्थात डॉ. दातार यांच्याकडे गरोदर महिला तपासणीसाठी येणे हे काही नवीन नाही. पण, ही महिला म्हणजेच 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी, जी 27 आठवड्यांची गरोदर आहे.

मुंबईत 12 वर्षांची एक मुलगी 27 आठवड्यांची गरोदर असल्याची घटना समोर आली आहे. मुलीसोबत नेमके काय झाले याची जराही कल्पना तिच्या पालकांना नव्हती. आपल्या मुलीला थायरॉईडचा त्रास झाला असेल असे गृहीत धरून पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. पण, डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे कळाले.

मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडे मुलगी उपचारासाठी गेली होती. त्यानंतर ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. ती मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने तिच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

पण, आता त्या मुलीचा गर्भपात करायचा निर्णय त्या मुलीच्या कुटुंबियांनी घेतला आहे. पण, भारतात 20 आठवड्यांवरील गर्भपातास कायद्याने परवानगी नाही. म्हणून डॉ. निखिल दातार आता या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मदत करणार आहेत.

ही घटना मुलगी आणि पालक दोघांसाठी अत्यंत त्रासदायक आहे. या प्रकरणी आम्ही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची एकदा एफआयआरची कॉपी आम्हाला मिळाली की आम्ही लगेचच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू. मुलीला थायरॉईडचा त्रास झाला असेल म्हणून तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले, तेव्हा तिचे वजन वाढले होते. पण, प्रत्यक्षात ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे समजले. आता या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून त्या मुलीला आणि कुटुंबाला पुढील मानसिक त्रासापासून वाचवता येईल

- डॉ. निखिल दातार, स्त्रीरोगतज्ज्ञ


आरोपीला अटक

12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी फैय्याज अहमद इरशाद याला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. फैय्याज हा नागपाडा परिसरात टेलरिंगचे काम करतो. त्याच परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीशी त्याची ओळख होती. आरोपी तिच्या घरी येऊन ती अज्ञान असल्याचा फायदा उचलत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. पण आपला गुन्हा उघडकीस येईल या भीतीने तो शेवटी उत्तर प्रदेशला पळून गेला.  


 पॉक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी

  • पॉक्सो (POCSO) हा लहान मुलांना लैंगिक अत्याचाराविरोधात संरक्षण देतो
  • लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांच्या भावनांचा यात विचार केला जातो
  • या कायद्यानुसार अशा घटनांचा तपास फक्त वरिष्ठ पोलिस अधिकारीच करतात
  • या घटनांमध्ये पोलिसांना घरी येण्याचीही गरज लागत नाही 
  •  जर घरी आलेच तर ते साध्या कपड्यांमध्ये येतात
  • मुलांना पुन्हा-पुन्हा पोलिस ठाण्यात बोलवले जात नाही
  • वैद्यकीय तपासणीसाठी महिला डॉक्टरची मदत घेतली जाते
  • पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची सुनावणी इन कॅमेरा होते


डॉ. निखिल दातार यांनी आतापर्यंत 9 महिलांना मदत केली आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 20 आठवड्यानंतर गर्भपाताची परवानगी मिळवून दिली आहे. या महिलांच्या गर्भात काही दोष असल्याचे 20 आठवड्यांनंतर लक्षात आले होते.

डॉ. निखिल दातार सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताची विनंती करणारी याचिका दाखल करणार आहेत. आपल्या देशात 1971 च्या गर्भपात कायद्यातील कलम 3 नुसार 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपात करता येतो. यानंतर गर्भपाताची परवानगी नाही.


हेही वाचा -  

एका वर्षात 33,526 गर्भपात

थांबणार गर्भपात करणाऱ्या औषधांचा ऑनलाईन बाजार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा