थांबणार गर्भपात करणाऱ्या औषधांचा ऑनलाईन बाजार


थांबणार गर्भपात करणाऱ्या औषधांचा ऑनलाईन बाजार
SHARES

मुंबई – सांगलीतील म्हैसाळ भ्रूण हत्या प्रकरणानंतर अखेर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आली आहे. गर्भपाताच्या एमटीपी किटची बेकायदा विक्री करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरसह ऑनलाईन औषध विक्रीस बंद असतानाही गर्भपाताच्या एमटीपी किटची ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाईटकडे एफडीएच्या मुंबई विभागानेे मोर्चा वळवला आहे.

गेल्या आवठड्याभरापासून डिस्ट्रीब्युटरची कसून तपासणी केली जात आहे. तर, दोन वेबसाईट एमटीपी किटची ऑनलाईन विक्री करत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता या दोन वेबसाईट एफडीएच्या रडारवर असून या वेबसाईटविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हला दिली आहे.

म्हैसाळ भ्रूण हत्येने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. गर्भपाताची औषधे, एमटीपी किट ही शेड्युल एच -1 मध्ये मोडत असून या औषधांच्या विक्रीचे नियम अत्यंत कडक आहेत. असे असतानाही शेड्यूल एच-1 मधील औषधांची खुलेआम, बेकायदा विक्री होत असल्याचेही यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे. मुळात शेड्यूल एच-1 मधील गर्भपाताच्या औषधांसह सर्वच औषधांच्या विक्रीवर करडी नजर ठेवण्याचे काम एफडीएचे आहे. मात्र, याकडे एफडीएचे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा गैरप्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोप सातत्याने आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आणि फार्मासिस्ट संघटनांकडून होत आहे. तर, ऑनलाईन औषध विक्रीमुळे नशेचा आणि गर्भपाताचा बाजार वाढेल, असा इशाराही या संघटनांनी देत याविरोधात आवाज उठवला. पण, सरकार आणि एफडीएने अजूनही या बाबींना गांर्भीयाने घेतले नसल्याचेच चित्र आहे.

आता मात्र म्हैसाळ प्रकरणानंतर मुंबईत एफडीए सक्रीय झाली आहे. एमटीपी किटची विक्री करणाऱ्या 38 डिस्ट्रीब्यूटरची आठवड्याभरात तपासणी करण्यात आली आहे. यात एकही डिस्ट्रीब्यूटर दोषी आढळला नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर, मेड प्लस आणि मेड मार्ट या वेबसाईटवरून ऑनलाईन एमटीपी किटची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही वेबसाईटच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय एफडीएने घेतल्याचंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. 

एफडीएच्या सहआयुक्त (औषध) बृहन्मुंबई विनिता थॉमस यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर गर्भपाताच्या बेकायदा विक्रीला आळा घालण्यासाठी नियमितपणे अशा तपासणी करण्यात येतील आणि स्त्री भ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असा निर्धारही त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना व्यक्त केला आहे.

एमटीपी कीट वापराचे नियम

  • एमटीपी कीट हे गर्भपातासाठी वापरले जाणारे औषध
  • शेड्युल एच-1 मध्ये हे औषध मोडते
  • या औषधाची विक्री औषध दुकानांमध्ये करता येत नाही
  • स्त्री रोग तज्ज्ञ त्यातही अधिकृत, नोंदणीकृत केंद्रातील स्त्री रोग तज्ज्ञांचे प्रिस्क्रीप्शन असेल तरच एमटीपी कीटची विक्री करता येते
  • एमटीपी किटच्या खेरदी-विक्रीचा सर्व रेकॉर्ड डिस्ट्रीब्यूटरसह रूग्णालयांना ठेवावा लागतो
  • तर एफडीएने या रेकॉर्डसह एमटीपी कीटच्या खरेदी-विक्रीवर करडी नजर ठेवणे, नियमित तपासणी करणे बंधनकारक असते.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा