एका वर्षात 33,526 गर्भपात


एका वर्षात 33,526 गर्भपात
SHARES

शासन एकीकडे गर्भपात रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतानाच मुंबईतील गर्भपातासंदर्भातले धक्कादायक आकडे समोर आले आहेत. गर्भपात प्रतिबंध 1975 (एमटीपी) या कायद्यांतर्गत एका वर्षात 33 हजार 526 गर्भपात झाल्याची माहिती उघड झाली आहे. यामध्ये 32,156 विवाहित महिलांचा समावेश आहे, तर 1,336 अविवाहित महिलांचा समावेश आहे.

मागील अनेक वर्षापासून अनधिकृतरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण या धक्कादायक आकड्यांमुळे सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे सरकारकडून गर्भपात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र एका वर्षात 33 हजार 526 गर्भपात झाले आहेत. तसेच हे सर्व गर्भपात एमटीपी कायद्यांतर्गत झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा