चिमुरडीवर शाळेच्या शिपायानंच केलं लैंगिक अत्याचार

 Malad
चिमुरडीवर शाळेच्या शिपायानंच केलं लैंगिक अत्याचार
Malad, Mumbai  -  

मालाड पूर्व येथील एस. जे. पोद्दार इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलीवर त्याच शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या बाहेर गोंधळ घालत घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिपायाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपी शिपायाने त्या मुलीला फूस लावून शाळेच्या बाथरुममध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबद्दलची माहिती इतर पालकांना मिळताच मंगळवारी सकाळी शाळेच्या बाहेर घटनेचा पालकांनी निषेध व्यक्त केला. काही वेळानंतर तेथे दाखल झालेल्या दिंडोशी पोलिसांनी हे प्रकरण हाताळत पालकांना शांत केले.


शाळा प्रशासनाने मागितली माफी

शाळेत झालेल्या या घटनेबद्दल स्कूल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत पालकांची माफी मागितली. आरोपीविरोधात पोलिस कठोर कारवाई करतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी पालकांना दिले.हेही वाचा -

पोटच्या मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

तुमच्या चिमुरड्यांना 'या' नराधमापासून वाचवा!


Loading Comments