चारकोपमध्ये चालत्या कारमध्ये बलात्कार

CHARKOP
चारकोपमध्ये चालत्या कारमध्ये बलात्कार
चारकोपमध्ये चालत्या कारमध्ये बलात्कार
See all
मुंबई  -  

चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 25 वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती इको कारमधून आलेल्या चारजणांनी या तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला मढ येथे नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

चालकोप पोलिसांनी पीडित तरुणीची तक्रार नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे तिघा तरुणांना ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. पीडित तरुणी कामानिमित्त घराबाहेर आलेली असताना एक कार अनाचक तिच्याजवळ येऊन थांबली. या कारमध्ये बसलेल्या चारजणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये खेचले.


मढमध्ये नेऊन केले अत्याचार

त्यानंतर ही कार मढमध्ये नेण्यात आली. तेथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी तिला चारकोप सिग्नलवर आणून सोडले. पीडित तरुणीने थेट चारकोप पोलिस ठाणे गाठत, झालेला प्रकार सांगितला.


चुकीचा गाडी क्रमांक

पीडित तरुणीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, चारही तरुणांना ती ओळखत नसून ते एकमेकांसोबत मराठीत बोलत होते. परंतु, पीडित तरुणीने जो गाडी क्रमांक पोलिसांना सांगितला, तो इको कारचा नसून मोठ्या गाडीचा आहे.

गाडीचा क्रमांक जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्या ठिकाणी पीडित तरुणीला उतरवण्यात आले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत. त्यामुळे पोलिसांचे विशेष पथक या घटनेचे फुटेज मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

चारकोप पोलिसांच्या पथकासोबतच गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही या तपासात गुंतले आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही तरुण या तरुणीचे पूर्वीचे प्रियकर आहेत.
हे देखील वाचा -

सावधान ! तुमचेही व्हॉट्सअॅप होऊ शकते हॅक!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.