तुमच्या चिमुरड्यांना 'या' नराधमापासून वाचवा!

Mumbai
तुमच्या चिमुरड्यांना 'या' नराधमापासून वाचवा!
तुमच्या चिमुरड्यांना 'या' नराधमापासून वाचवा!
तुमच्या चिमुरड्यांना 'या' नराधमापासून वाचवा!
See all
मुंबई  -  

मुंबई आणि नवी मुंबईतल्या रहिवाशांनो, तुमचे लहान मूल कुठे एकटे जात असेल किंवा खेळत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण या परिसरात असा नराधम फिरतोय ज्याची वाकडी नजर अशा लहान मुलांना लक्ष्य  करतेय. तो कोणत्याही बहाण्याने चिमुरड्यांना गुंगीचे औषध देतो आणि अपहरण करुन, निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतो.


अशा प्रकारे करतो मुलांना लक्ष्य

साधारणपणे 20 ते 25 वयोगटातला हा तरुण दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरत असतो. एकटे खेळणाऱ्या मुला-मुलींना हेरतो आणि तुमच्या घरातला सिलेंडर आला आहे, तर कधी पत्ता विचारण्याच्या नावाखाली त्या मुलांना गुंगीचे औषध देतो. मग हा नराधम त्यांना निर्जनस्थळी घेऊन जातो आणि तिथे त्यांच्यावर शाररिक अत्याचार करतो. आतापर्यंत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात असे 6 प्रकार समोर आले असून या सगळ्यांच्या मागे एकच नराधम असल्याचा संशय पोलिसांना आहे.


कधी आणि कुठे झाले अत्याचार?

  • 3 एप्रिल - खारघरमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
  • 26 मे - चारकोपमध्ये 7 वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचाराचा प्रयत्न
  • 9 जून - 10 वर्षाच्या मुलाला खारघरमध्ये केले लक्ष
  • 12 जून - लहान मुलीसह एका चिमुरड्याला इमारतीच्या टेरेसवर नेऊन केले अत्याचार
  • 9 जुलै - 9 वर्षाच्या मुलीवर केले अत्याचार


या तरुणाचे वय साधारण 25 वर्ष असून तो मध्यम बांध्याचा आहे. त्याचा रंग सावळा आहे. कधी तो त्याचे नाव महेश तर, कधी राज असल्याचे सांगतो. पोलिसांना एकूण तीन ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, नवी मुंबई आणि मुंबई पोलिस देखील युद्धपातळीवर त्याचा शोध घेत आहेत.हेही वाचा - 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात

नराधम आजोबाचा 6 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.