नराधम आजोबाचा 6 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार

 Wadala Road
नराधम आजोबाचा 6 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार
Wadala Road, Mumbai  -  

वडाळ्यातील कोकरी आगार परिसरात एका नराधमाने 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली आहे. सेल्वकुमार तंबीराज शेट्टीयार(33)असं या नराधमाचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. वडाळ्यातील कोकरी आगार झोपडपट्टीत राहणारा सेल्वकुमार तंबीराज शेट्टीयार याच्या शेजारी त्याची भाची आपल्या कुटुंबासह राहते. नातेवाईक असल्याने दोन्ही कुटुंबात मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे या कुटुंबाचे त्यांच्या घरी ये-जा असे. तसेच ही 6 वर्षांची चिमुरडी आजोबा या नात्याने त्याच्या घरी जात असे.  याचाच फायदा घेत या नराधमाने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.

गुरुवारी सायंकाळी दोन लहान चिमुरड्या घराबाहेर खेळताना अश्लील कृत्य करीत होत्या. ते पीडित चिमुरडीच्या घरच्यांनी पाहिले आणि आपल्या चिमुरड्यांना दम भरला असता सेल्वकुमार तंबीराज शेट्टीयार याच्या काळ्या कृत्याचे पितळ उघडे पडले. संतापलेल्या चिमुरडीच्या आईने आपल्या मामा विरोधात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुरेश खरात यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले असून, वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे अधिक तपास करीत आहेत.

Loading Comments