अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात

 Palghar
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात

वसई वाळीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या नराधमाला मंगळवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावरून पोलिसांनी या नराधमाला पकडले आहे. हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मार्टीन लोपीस असं या नराधमाचं नाव असून, तो वसई पूर्व परिसरातील गोखिवरे येथे राहत होता. 

लोपीसच्या घरी घरकाम करण्यासाठी पीडित मुलीची आई येत असे. त्या आपल्या 12 वर्षीय मुलीला आपल्यासोबत त्याच्या घरी घेऊन येत असत. तसेच दुसरीकडे कामाला जाताना त्या आपल्या मुलीला लोपीसच्या घरी ठेवत. मात्र या नराधमाने याचाच फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. त्यातच ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म देखील दिला होता. त्यानंतर हा नराधम अमेरिकेमध्ये फरार झाला. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी त्याला पसार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या नराधमाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Loading Comments