'त्या' वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांची दिलगिरी

 Vidhan Bhavan
'त्या' वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांची दिलगिरी

जीएसटीबद्दल चर्चा करताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंदा म्हात्रे आणि भारती लव्हेकर यांना उद्देशून 'आमचेचं प्रॉडक्‍ट आहे' असे वक्तव्य केले होते. आजच्या दिवसाचे कामकाज संपण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी जयंत पाटील यांना आवाहन केले की, जयंत पाटील महिला विरोधी नाहीत मात्र ज्या प्रकारचे शब्द वापरले गेले ते चुकीचे आहेत, याबद्दल खेद व्यक्त करावा. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.

शनिवारी जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाच्या महिला आमदारांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी भाषण करताना महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य मानहानीकारक आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहात केली होती. यावेळी चर्चेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले की, राष्ट्रवादीने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. जयंत पाटील यांनी कसलाही अपशब्द वापरला नाही. त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नाही. शनिवारी जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणातील आक्षेपार्ह शब्द विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काढण्याचे आदेश दिले आहेत.

Loading Comments