पोटच्या मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

  Malad
  पोटच्या मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक
  मुंबई  -  

  आपल्याच 14 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधम बापाविरोधात मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या 40 वर्षांच्या आरोपी पित्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

  मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादंवि कलम 354, 504 आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मालाड पोलिस करत आहेत.

  पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार तिने पोलिसांसमोर केली होती. यासंदर्भात तिने अनेकदा तिच्या आईलाही सांगितले होते. पण पीडित मुलीच्या आईने आपल्या पतीला समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने दुर्लक्ष केले.


  आपल्याच मुलीला पाठवत होता अश्लील व्हिडिओ

  पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप हा त्याच्या मोबाईलवरून तिला अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता. जर तोंड उघडले तर, जीवे मारण्याची धमकीही देत होता. पण जेव्हा तिला याचा त्रास होऊ लागला, तेव्हा तिने सर्व हकीगत आईला सांगितली. पत्नीने समजावल्यानंतरही तो मुलीला त्रास देतच होता. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
  हेही वाचा

  अखेर पवईतला विकृत गजाआड


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.