सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

 Sewri
सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन आपल्याच अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. फारूख मुख्तार शेख (51) असं या नाराधमाचं नाव असून शिवडी पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली होती.

पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिची आई मुन्नी फारूख शेखने 18 एप्रिल 2017 रोजी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलगी साडेतीन महिन्यांपासून गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिने मुलीला विचारले असता मुलीने वडिलांचे नाव सांगितले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने शिवडी पोलीस ठाण्यात जाऊन फारूख मुख्तार शेख याच्या विरोधात तक्रार नोंदवली. याची खबर फारुखला लागल्याने त्याने शिवडीतून पळ काढला. मात्र त्याच्या मागावर असलेल्या शिवडी पोलिसांनी त्याला शिवडी बंदर येथून शनिवारी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नावगे यांनी दिली.

Loading Comments