अखेर पवईतला विकृत गजाआड

Powai
अखेर पवईतला विकृत गजाआड
अखेर पवईतला विकृत गजाआड
See all
मुंबई  -  

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत महिलांच्या विनयभंगाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी धावत्या ट्रेनमध्ये, कधी दिवसाढवळ्या सोसायटीमध्ये तर कधी भर रस्त्यावर तरुणींचा विनयभंग केला जात आहे, त्यांच्यासमोर अश्लील चाळे केले जात आहेत. गंभीर बाब म्हणजे यातल्या काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची विशेष दखल घेतली गेली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईत महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच, या प्रकरणांनंतर मुंबईतील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, नुकतंच मुंबई पोलिसांनी एका सिरियल मोलेस्टरला अटक करुन हा कमी झालेला विश्वास पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे.


विनयभंगाचे 11 गुन्हे दाखल

कल्पेश देवधर नावाच्या एका सिरियल मोलेस्टरला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्पेशवर विक्रोळी, पार्क साईट, पंत नगर, गोवंडी, डी. एन. नगर, कांदिवली, बांगुरनगर या ठिकाणी तब्बल 11 विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे कल्पेशला यातल्या एका प्रकरणात तुरुंगाची हवाही खावी लागली होती. मात्र सुटका झाल्यानंतर पुन्हा तेच प्रकार कल्पेशने सुरु केल्याचं समोर आलं आहे.


13 जुलैचा धक्कादायक प्रकार...

गुुरुवारी अर्थात 13 जुलैलाही कल्पेशने पवई परिसरात भर रस्त्यात मुलींसमोर हस्तमैथुन करण्याचा प्रकार केला होता. हिरानंदानी परिसरातल्या इटर्निया बिल्डिंगसमोरून काही कॉलेजच्या तरुणी जात असताना एका बाईकवर कल्पेश तिथे पोहोचला. त्याने या मुलींना बघून हस्तमैथुन करायला सुरुवात केली. धास्तावलेल्या मुलींनी तात्काळ 100 नंबर वर फोन करुन मदत मागितली. पोलीस आले खरे, पण तोवर हा विकृत तिथून पळून गेला होता.


पवईत घडलेल्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालं होतं. त्यावरून आरटीओकडून आम्ही गाडीचा नंबर मिळवला. त्याचबरोबर खबरीच्या मदतीने आरोपीची ओळख पटल्यावर आम्ही त्याला गोवंडी परिसरातून अटक केली.

रश्मी करंदीकर, प्रवक्त्या, मुंबई पोलिसहेही वाचा

या विकृतांना ठेचायलाच हवं!

...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.