शिवाजी पार्कात अभिनेत्रीचा विनयभंग

 Shivaji Park
शिवाजी पार्कात अभिनेत्रीचा विनयभंग

मुंबईच्या शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका मराठी मालिकेत अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीचा बुधवारी विनयभंग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी सुशील पोयरेकर (32) नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

असे सांगितले जात आहे, प्रभादेवीला राहाणारा हा सुशील पोयरेकर गेल्या कित्येक दिवसापासून या अभिनेत्रीचा सायकलवरून पाठलाग करत होता. मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कहर तेव्हा झाला जेव्हा बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना या सुशील पोयरेकरने अभिनेत्रीला धक्का दिला. त्यानंतर मात्र अभिनेत्रीला गप्प राहणे अशक्य होते. तिने थेट पोलिसांना संपर्क करत तक्रार केली. त्यानंतर पोलिस शिवाजीपार्कला पोहचले आणि त्यांनी सुशीलला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री तक्रार देण्याच्या मनःस्थितीत नव्हती. पण पोलिसांनी अभिनेत्रीचे मन वळवले. त्यानंतर अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुशीलला कलाम 354 अंतर्गत अटक करून त्याला कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.

Loading Comments