...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!

Kashimira
...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!
...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!
...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!
...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!
...आणि प्रिया बेर्डेने त्याच्या कानाखाली वाजवली!
See all
मुंबई  -  

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी असलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

मीरा रोड येथील एका सिनेमागृहात 15 जुलैच्या संध्याकाळी त्या आपल्या मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान बोरिवलीत राहणारा व्यापारी सुनील जानी याने त्यांची छेड काढली. त्यानंतर प्रिया बेर्डे यांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि थिएटरमधील गार्डच्या मदतीने आरोपीला पकडून काशिमीरा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपी सुनील जानीच्या विरोधात भादंवि कलम 354 आणि 509 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून ठाणे कोर्टात हजर केले. मात्र तेथे त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.


काशिमीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीसोबत आणखी तीन जण होते. ते तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. प्रिया यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, संध्याकाळी 5.30 वाजता सिनेमा सुरू होताच या तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर प्रेक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते गप्प झाले.


ते सर्वजण प्रिया यांच्या मागच्या सीटवरच बसले होते. सुनील देखील त्याच ग्रुपमध्ये होता. त्यावेळी त्यांच्यामधील दोघेजण पुढच्या सिटवर बसण्यासाठी निघून गेले. काही वेळानंतर आलेल्या सुनीलने त्या दोघांबद्दल प्रिया यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. थोड्या वेळानंतर आपल्याला कुणीतरी स्पर्श करत असल्याचे प्रिया यांना जाणवले. जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले, तेव्हा तो त्यांच्या मागेच बसला होता. त्यावेळी त्यांनी सरळ त्याच्या कानशिलात लगावली आणि थिएटरचा अलार्म वाजवला. आरोपीला पकण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला पण तो त्यांना धक्का देऊन पळून गेला.

त्या तिथपर्यंतच थांबल्या नाहीत तर, त्यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांची मदत घेत आरोपीला शोधायला सुरुवात केली. तो थिएटरच्या बाहेरच उभा होता. त्यांना पाहताच तो पुन्हा थिएटरमध्ये पळून जाऊ लागला. त्याचवेळी गार्ड्सने त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.
हेही वाचा -

शिवाजी पार्कात अभिनेत्रीचा विनयभंग

तेलगू अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.