तेलगू अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

  Oshiwara
  तेलगू अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
  मुंबई  -  

  मुंबईच्या ओशिवरा येथे अभिनय शिकवणाऱ्या शिक्षकाने एका तेलगू अभिनेत्रीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अंशुमन सिंग (30) नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

  ही 22 वर्षीय तेलगू अभिनेत्री ओशिवरा परिसरातच रहात असून ती अंशुमन सिंगकडे अभिनय शिकण्यासाठी जात होती. या अभिनेत्रीने सिंग याला अभिनय शिकविण्याकरीता सहा महिन्यांसाठी 48 हजार रुपयांची फी देखील दिली होती. क्लासला न येण्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.

  या अभिनेत्रीने 15 तारखेला हैदराबादला जाणार असल्याचे अंशुमन सिंगला सांगितले होते. त्यावर त्याने तिला घरी बोलावून घेतले आणि तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तिथून निघून जात असताना अंशुमनने तिच्यावर हात टाकून तिचा विनायभंग केल्याचे या अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर कशीबशी तिने स्वत:ची सुटका केली आणि पोलीस कंट्रोल रुमला फोन केला.

  या प्रकरणी आम्ही आरोपीला 354, 354 (अ) 354 (ब) 509, आणि 506 कलमांतर्गत अटक केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्त्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.