चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Churchgate
चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
See all
मुंबई  -  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. 8 जुलैची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

एक तरुणी चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकलची वाट पाहात उभी होती. त्यावेळी आरोपी तरुणाने चालताना जाणीवपूर्वक मुलीला स्पर्श करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने या तरूणाच्या मागे धाव घेऊन त्याला एका प्रवाशाच्या मदतीने पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी अल्पवयीन असून त्याचे वय 16 वर्षे आहे. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला आरोपी काळाघोडा परिसरात रहात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.हे देखील वाचा -

लोकलमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताविरोधात गुन्हा दाखलडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.