लोकलमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताविरोधात गुन्हा दाखल

  मुंबई  -  

  रोज कुठे न कुठे महिलांवर अत्याचार होतच असतात. लोकलमधून प्रवास करताना देखील महिला आजही असुरक्षितच आहेत. नुकतेच याचे प्रत्यय चर्चगेट ते बोरिवली लोकलमध्ये आले.

  चर्चगेट ते बोरीवली लोकलने प्रवास करताना 22 वर्षीय तरुणीसमोर एक विकृत मानसिकतेचा तरुण अश्लील चाळे करत होता. विशेष म्हणजे तरुणीने रेल्वेच्या हेल्पलाइनवर फोन करून घडलेला प्रकार संगितला. पण त्याकडे आरपीएफ जवानाने दुर्लक्ष केले. त्यामुळे तरुणीने हा सगळा प्रकार फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांना जाग आली आहे.

  त्या तरुणाविरोधात भादवी 354 (1) , 509 , 504 , 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे पोलिस आयुक्त कराड यांनी दिली आहे.


  24 मे रोजी घडला होता प्रकार?

  मुलुंडला राहणारी तरुणी 24 मे रोजी बोरीवलीहून चर्चेगेटच्या दिशेने जात होती. महिला डब्याला लागून असलेल्या अपंगांच्या डब्यात उभा असलेला विकृत महिलांना पाहून अश्लिल चाळे करत होता. तो अर्वाच्य भाषा देखील वापरत होता. हा विकृत एवढ्यावरच थांबला नाही तर, चक्क पॅन्टची झिप उघडून तो अश्लील चाळे करू लागला.

  त्यावेळी तरुणीने रेल्वे हेल्पलाइन नंबरवर फोन केला पण तिथे असलेल्या आरपीएफचा जवान तिच्यावर हसला आणि फोन कट केला. गाडी कांदिवलीला येताच हा नराधम अपंगांच्या डब्यातून उतरला आणि बलात्कार करण्याची धमकी या मुलीला दिली. त्यानंतर इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर विकृत तिथून पळाला.

  त्यानंतर हा सगळा प्रकार तरुणीने फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून आरपीएफच्या जवानाला देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिस त्या विकृताला कधी अटक करतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.  हे देखील वाचा -

  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

  अशा प्रवृत्ती कोण ठेचणार?  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.