अशा प्रवृत्ती कोण ठेचणार?

विक्रोळी - गावगुंडांनी बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांना शिविगाळ करत मारण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पोलिसांनी राजेश यादव, भुल्लन यादव याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्यात. पत्रकारांवर झालेला हा पहिलाच हल्ला नाही याआधीही पत्रकारांवर अशाप्रकारचे हल्ले झालेत. मात्र एकीकडे नरेंद्र मोदी काळा पैसा संपवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे अशी विकृती समोर येतेय. आणि ते चूक असल्याचे दाखवण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण होते. त्यामुळे अशा प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी सरकारनं वेळीच पाऊल उचलंण गरजेचं आहे.

Loading Comments