अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कुरार - एका 60 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईतल्या कुरारमध्ये उघडकीस आली आहे. आरोपी हा कुरार परिसरातीलच राहणारा आहे. तिथल्या संतप्त रहिवाशांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपीला फाशी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत दोन मुलींचा जबाब नोंदवलाय. पण या नराधमाने यापूर्वीही आणखी मुलींवर लैंगिक अत्याचार केले असतील अशी शंका पोलिसांना व्यक्त केली आहे.

Loading Comments