सिद्धिविनायक मंदिराला नोटीस, पाहणी दरम्यान आढळले...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

पालिकेने प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. समस्यांचे निराकरण न केल्यास BMC ने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मंदिर परिसरात स्वयंपाक करण्यास परवानगी नाही

12 मे रोजी, जी-उत्तर प्रभागातील अधिकाऱ्यांनी प्रभादेवी येथील मंदिराला भेट दिली आणि त्यांना असे आढळले की तळमजल्यावर तेल आणि तूप “बेकायदेशीरपणे” साठवले गेले आहे, तर दुसऱ्या मजल्यावर लाडू तयार केले जात आहेत.

तसेच मंदिराच्या आवारात मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामाकरीता मोठा लोखंडी जिना उभारला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत पालिकेच्या दादर जी/उत्तर, इमारत व कारखाना विभागाने नोटीस बजावली आहे.

मंदिर सुरक्षेला धोका निर्माण होतो

या सर्व उल्लंघनांमुळे अभ्यागतांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, 16 मे रोजी इमारती आणि कारखाने विभागाने जारी केली. तेल आणि तूप या दोन्ही ज्वलनशील पदार्थ आहेत, त्यामुळे ते तात्काळ मंदिरातून हलवण्यात यावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पायऱ्यांच्या संदर्भात, पालिकेने सांगितले की लोखंडी संरचनेत सुरक्षा उपायांचा अभाव आहे, तसेच असे उल्लंघन “गंभीर स्वरूपाचे” आहे कारण दररोज असंख्य भाविक सिद्धिविनायकाला भेट देतात.

आग लागण्याच्या किंवा पायऱ्यांवरून पडण्याच्या घटना टाळण्यासाठी, BMC ने मंदिर व्यवस्थापनाला पालिका अधिकार्‍यांशी सल्लामसलत केल्यानंतर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. 


हेही वाचा

मुंबईत प्रती बालाजीचे भव्य मंदिर उभारणार, ७ जूनला भूमिपूजन

पुढील बातमी
इतर बातम्या