Advertisement

मुंबईत प्रती बालाजीचे भव्य मंदिर उभारणार, ७ जूनला भूमिपूजन


मुंबईत प्रती बालाजीचे भव्य मंदिर उभारणार, ७ जूनला भूमिपूजन
SHARES

महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता भाविकांना बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जावे लागणार नाही. आता मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील उलवे परिसरात भव्य तिरुपती मंदिर बांधले जाणार आहे. ज्याची रीतसर परवानगी आणि जमीन महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानला भगवान व्यंकटेश्वरासारखे मंदिर नवी मुंबईत बांधण्याची परवानगी दिली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानने येत्या ७ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवले आहे. हे महाराष्ट्रातील पहिले तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) असेल.

नवी मुंबईतील 10 एकर जागेवर बालाजीची प्रतिकृती येथे उभारण्यात येणार आहे. एप्रिल 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानला नवी मुंबई विमानतळाजवळची जमीन दिली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर आहे.उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यावेळी सिडकोने बालाजी मंदिर मंडळाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या विमानतळाजवळ मंदिर बांधण्यासाठी जागा मागितल्याचे पत्र दिल्याचे सांगितले होते.

रेड्डी यांच्या पत्रानंतर उद्धव ठाकरे यांनी सिडकोला जमीन देण्यास सांगितले होते. सध्या ज्या जमिनीवर मंदिर बांधले जाणार आहे ती जमीन यापूर्वी ट्रान्स हार्बर सी लिंक प्रकल्पाला देण्यात आली होती.

व्यंकटेशाचे मंदिर तयार झाल्यानंतर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील भाविकांना बालाजीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना नवी मुंबईतच देवाचे दर्शन घेता येणार आहे.हेही वाचा

'दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या' वारकऱ्यांची मागणी

घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा